top of page

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक, 500 कोटींची मागणी

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (MIDC)चा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून हॅकर्सकडून पाचशे कोटींची मागणीही करण्यात आली आहे. एमआयडीसीच्या अधिकृत ई- मेल आयडीवर मेलद्वारे 500 कोटींची मागणी करण्यात आली आहे. जर का मागणी पूर्ण केली नाही तर सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकीही हॅकर्सनी दिली आहे.

ree

गेल्या सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह 16 प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. एमआयडीसीशी संबंधीत सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.



एमआयडीसीच्या डेटा हॅक झाल्याचे समोर येताच एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरू करण्यात आली असून सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे. दरम्यान याआधीही गेल्यावर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता.


 
 
 

Comments


bottom of page