top of page

Tokyo Olympic: मेरी कोमचा विजयी पंच; अंतिम १६ मध्ये प्रवेश

भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली आहे. ६ वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या ‘सुपर मॉम’ मेरी कोमने डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेज हिला पराभूत केलं. मेरीकोमने हर्नांडिज हिला ४-१ ने पराभूत करत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. मेरी कोमचा पुढचा सामना २९ जुलैला असून कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित वालेंसिया विक्टोरियाशी तिची लढत होणार आहे.

ree

मार्च २०२० आशिया/ओसनिया क्वालिफायरच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं होतं. मेरी कोमची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे. यापूर्वी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कॉमने कांस्य पदक पटकावलं होतं.


 
 
 

Comments


bottom of page