top of page

PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी अखेर सापडला!


पंजाब नॅशनल बँकेच्या १३५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या फरार उद्योजक मेहुल चोक्सीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अँटिग्वातून फरार झालेल्या चोक्सीला डोमिनिकामध्ये जेरबंद करण्यात यश मिळालं आहे.

ree

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला होता. इंटरपोलनेही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. चोक्सी हा रविवारी एका मोटारीत दिसला होता, ती मोटार पोलिसांनी तपासात ताब्यात घेऊन चोक्सीबद्दल तपास सुरू केला होता. चोक्सी याने अँटिग्वा व बार्बुडाचे नागरिकत्व घेतले असून, तो दक्षिण भागात गाडी चालवताना दिसला होता. २३ मे रोजी चोक्सी अँटिग्वातून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. जानेवारी २०१८ पासून तो तेथे राहत होता अशी माहिती कॅरेबियन बेटावरील रॉयल पोलीस दलाने दिली होती. दरम्यान, चोक्सी डोमिनिकामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीआयडीने कारवाई करत त्याला अटक केली. सध्या तो सीआयडीच्या कोठडीत आहे.


 
 
 

Comments


bottom of page