top of page

मेहुल चोक्सीचे पोलीस कोठडीतील फोटो आले समोर

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सीला काही दिवसांपूर्वी डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून चोक्सी पोलीस कोठडीत असून, कोठडीतील त्याचे काही फोटो समोर आले आहेत. यात त्याचा एक डोळा लाल झालेला दिसत असून, हातावरही मोठे काळे व्रण दिसत आहेत.

ree

मेहुल चोक्सीला परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असतानाच त्याने बार्बुडानंतर २३ मे रोजी अँटिग्वातून पोबारा केला होता. अँटिग्वातून फरार झालेल्या चोक्सीला स्थानिक सीआयडीने ताब्यात घेतलं होतं..चोक्सीला अटक केल्यानंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी डोमिनिकामधील न्यायालयात धाव घेतली. तसेच मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच्या शरीरावर जखमा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच चोक्सीचे तुरूंगाताली फोटो समोर आले असून, त्याच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. त्याचा एक डोळा लाल झालेला असून, हातावरही काळेनिळे डाग दिसत आहे.


 
 
 

Comments


bottom of page