top of page

व्हिडिओ पाहा : देव तारी त्याला कोण मारी, पॉईंटमनने वाचवले मुलाचे प्राण

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी (१७ एप्रिल) आला. पॉईंटमननं आपला जीव धोक्यात घालून एका चिमुकल्याचा जीव वाचवला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ree

एक सेंकदाचाही वेळ झाला असता तर चिमुल्यासह पॉईंटमनलाही जीव गमवावा लागला असता. मात्र जीव धोक्यात घालून पाईंटमन रेल्वे रुळावर धावत आला आणि चिमुकल्याला जीवदान दिलं.

वांगणी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एक अंध महिला आपल्या मुलासह चालली असताना तिच्या मुलाचा तोल जाऊन तो रुळावर पडला. पाईंटमन मयूर शेळके यांनी क्षणाचाही विलंब न करता रुळावर धाव घेत त्या मुलाला वाचविले. एखाद्या चित्रपटातील दृष्य असल्यासारखी ही प्रत्यक्ष घटना घडली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय यावेळी आला. देवदूतासारख्या मयूर शेळके यांनी त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. एका सेकंदाचाही विलंब झाला असता तर मयूरलाही जीव गमवावा लागला असता हेही तितकंच खरं. मात्र जीवाची बाजी लावून त्यांनी चिमुकल्याला जीवदान दिलं.

पाईंटमनन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कामगिरीसाठी अनेक जण शाबासकी देत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 

Comments


bottom of page