top of page

टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवाने साधला पंतप्रधान मोदी, अमित शाहांवर निशाणा

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह कधीच नव्हते. भारतामधील आतापर्यंत सर्वाधिक चांगल्याप्रकारे लोकशाही मार्गाने काम करणारे ते नेते आहेत,” असं म्हटलं. मोदींना शाह यांनी मोस्ट डेमोक्रॅटीक म्हणजेच लोकशाहीचा सर्वाधिक आदर करणारे अशी उपाधी दिली. यावर जगप्रसिद्ध टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवाने ट्विट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

मार्टिना नवरातिलोवाने अमित शाह यांनी मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा उल्लेख असणाऱ्या वृत्तांकनाच्या पोस्टची लिंक शेअर करत “हा माझा पुढचा विनोद आहे,” असं म्हटलं आहे. नवरातिलोवाचं हे ट्विट ९ हजारहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलं असून त्यावर २ हजारांहून अधिक कमेंट आहेत. तसेच २६ हजारांहून अधिक जणांनी हे ट्विट लाइक केलं आहे. मार्टिनाच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.



Comments


bottom of page