top of page

मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी बापानेच घेतले 'सात फेरे'...

मुलीच्या लग्नाची संपूर्ण तयारी झाली... मुलीच्या हातावर मेहंदीही लागली ... पण या दरम्यान असं काही घडलं की, जो मंडप मुलीसाठी सजला होता त्याच मंडपात एक दिवस आधी वडिलांनी 'सात फेरे' घेतले ... विशेष म्हणजे मुलीच्या वडिलांचे या आधी दोन लग्न झाली आहेत आणि त्याला चार मुलंही आहेत... ही घटना झारखंडमधल्या लवाही कला ( जि. गढवा ) या गावात घडली आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय शिवप्रसाद वैद्य (रा. लवाही कला, जि. गढवा ) हा गावातीलच एका मुलीची शिकवणी घ्यायचा. याच दरम्यान त्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तीन वर्षांपूर्वी ती मुलगी घरातून बेपत्ता झाली. मुलीच्या वडिलांनी शिक्षक शिवप्रसाद वैद्य यांच्यावर संशय व्यक्त करत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र त्यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.


तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलीच्या कुटुंबियांना दोन दिवसांपूर्वी त्यांची मुलगी छत्तीसगडमधल्या एका गावात असल्याची माहिती मिळाली.. त्या मुलीचा शोध लागल्यानंतर तिला छत्तीसगड इथून आणण्यात आलं. शिवप्रसाद वैद्य याने तिला तिथे भाड्याच्या घरात ठेवलं होतं. ती मुलगी एका मुलाची आई बनली असल्याचे समजल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी गावातील लोकांना आणि समाजाला याची माहिती दिली. पोलिसांनी शिवप्रसाद वैद्य यांना बोलावून चौकशी केली. अखेर त्यानं सर्व कबूल केलं. त्यानंतर गावकऱ्यांच्या दबावामुळे शिव प्रसादला त्या मुलीसोबत लग्न करावं लागलं. यावेळी पोलिसांसह गावातील आणि समाजातील शेकडो लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी (२० एप्रिल) शिवप्रसाद वैद्य याच्या मुलीचं ठरलेलं लग्नही थाटात पार पडलं.


 
 
 

Comments


bottom of page