top of page

मराठा आरक्षण: उपसमितीची स्थापना

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचललं आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपसमितीला मान्यता दिली आहे. या उपसमितीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभुराज देसाई आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार एक समिती गठित करण्यात आली आहे. याच अध्यक्ष पद चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे. यापुढे मराठा आरक्षणबद्दल बैठका होतील किंवा शिष्टमंडळे येतील जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील ते ही समिती घेईल. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल. मुख्यमंत्री कार्यलयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आहे.


 
 
 

Comments


bottom of page