top of page

मराठा आरक्षण : मूक आंदोलनात लोकप्रतिनिधींनी मांडली भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात आज भर पावसात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी मूक आंदोलनाला सुरुवात झाली. या ‘मूक आंदोलन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, युवराज मालोजीराजे छत्रपती हे सहभागी झाले आहेत.

ree

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरात आज मूक आंदोलन होत आहे. सकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरु आहे. अशाही स्थितीत भर पावसात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर संभाजीराजे यांनी "आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या,” असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केलं.


जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या आंदोलनाकडे येत आहेत. लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलनस्थळी होत आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी आपल्या मनोगतामध्ये मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितलं आहे.

दरम्यान, आंदोलनाला सुरुवात होण्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र संभाजीराजे यांना दिलं.


 
 
 

Comments


bottom of page