top of page

मनसेच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ree

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना (डी विभाग ) तर्फे जिव्हेश्वर चॅरिटेबलं ट्रस्ट आणि श्री साईदत्त क्रीडा मंडळ (खोताची वाडी ) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि १९ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मनसे रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना (डी विभाग ) चे प्रशासकीय सचिव नितीन कोलगे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. श्री साई दत्त चौक, खोतांचीवाडी, गिरगांव, मुंबई येथे आयोजित केलेल्या या नेत्र तपासणी शिबिरास उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला. १५० जणांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले.

ree


यावेळी विभाग अध्यक्ष निलेश शिरधनकर, रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अमित शिंदे, समीर राऊत, सावळाराम चिपकर, प्रशांत गांधी, परेश मोघे, दिनेश साडवीलकर, दिनेशजी पोतदार यांच्यासह मनसे सैनिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



 
 
 

Comments


bottom of page