top of page

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक; ९ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने केली कारवाई

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी आज मोठी कारवाई केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. सिसोदिया यांना सोमवारी (२७ फेब्रवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

ree

मनिष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. सिसोदिया यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी सिसोदिया यांच्या निवासस्थानी तसेच सीबीआय कार्यालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त ठेवला होता. मनिष सिसोदिया यांची आज नऊ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत सिसोदिया यांना अनेक प्रश्न विचारल्याचे म्हटले जात आहे. या ९ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे.





Comments


bottom of page