top of page

Video पाहाच! स्कुटीचालक मध्ये आला अन् क्षणात ....

रस्ते अपघातात अनेकांचा जीव जातो. मात्र, यातील काही अपघात वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होतात. असाच एक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे दृश्य हे थरारक आहे. एका छोट्या चुकीमुळे या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ree

कर्नाटकमधील मंगलोर येथील हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओत एका बाजूने एक स्कुटी चालक स्कुटी घेऊन रस्त्याच्या मधोमध थांबताना दिसत आहे. त्याच्या समोरुन भरधाव वेगाने एक दुचाकीस्वार येताना दिसतोय. वळणाचा रस्ता असल्यामुळे समोर असलेली स्कुटी दुचाकीवरील व्यक्तीला दिसली नाही. स्कुटीवरील व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील व्यक्ती समोर असलेल्या काँक्रीटच्या भिंतीला धडकतो. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे दुचाकीस्वार थेट हवेत उडाल्याचे दिसते. अपघातग्रस्त दुचाकीस्वारास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

हा अपघात झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्या स्कुटीमुळे हा अपघात झाला, तोच व्यक्ती अपघातानंतर पळ काढताना दिसतोय. या व्हिडीलो पाहून अनेकांनी कमेंट्स, शेअर करत प्रवास करताना खबरदारीने दुचाकी चालवावी असे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.


 
 
 

Comments


bottom of page