top of page

साताराः वाई तालुक्यातील सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

साताराः वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाख येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. त्यांच्यावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, ८ वर्षाचा मुलगा, १० महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.

ree

लडाख येखे मांढरे यांची पहाटेपासून नेमणूक होती. यावेळी हवामानातील बदलामुळं त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देश सेवा करीत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीर मरण आले. ही दुःखद बातमी वाई तालुक्यातील गावागावात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


 
 
 

Comments


bottom of page