top of page

आश्चर्य !…२५ वर्षीय महिलेने एकाच वेळी दिला नऊ बाळांना जन्म

आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला असून सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं आहे. २५ वर्षीय हालीमा सिसी असं या महिलेचं नाव असून चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून तिला मोरक्कोमधील रुग्णालयामध्ये ३० मार्च रोजी दाखल करण्यात आलं होतं. तिची तपासणी केली असता ती सात बाळांना जन्म देईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र नऊ बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.

ree

मोरक्कोचे आरोग्यमंत्री रिचर्ड कोऊधारी यांनी आपल्याला या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमध्ये या महिलेने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला असून सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आल्याचं सांगितलं आहे. “ही महिला आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे,” असं मालीच्या आरोग्यमंत्री असणाऱ्या फॅण्टा सीबे यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं आहे. या महिलेसोबत गेलेल्या मालीमधील डॉक्टरांकडून आपण तिच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती घेत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. काही आठवड्यांनंतर ही महिला आणि बाळं मायदेशी परततील असं सांगण्यात आलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page