top of page

मलायका अरोराच्या गाडीला अपघात

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या गाडीचा मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मलायकाला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मलायकाची तब्येत आता ठीक आहे. तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.

ree

शनिवारी मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत एका कारने अचानक ब्रेक लावल्याने मुंबई-पुणे हायवेवर तीन ते चार गाड्या एकावर एक आदळल्या. अभिनेत्री मलायका अरोरा हिची गाडी समोरच्या एका स्विफ्ट गाडीला धडकल्याने मलायका अरोराही किरकोळ जखमी झाली आहे. तिच्या गाडीत ड्रायव्हर आणि तिचा बॉडीगार्ड होता मात्र त्यांना काहीही दुखापत झाली नसून अभिनेत्री मलायका अरोरा हिला दुखापत झाली आहे. दरम्यान यात मलायकाच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीच्या पुढील भाग चक्काचूर झाला आहे.


 
 
 

Comments


bottom of page