top of page

माझ्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणी "कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. यापुढे अशी विधाने करणार नाही असं म्हणत कोर्टाची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. मात्र हे ट्विट कोणावर टीका करणारे, आरोप करणारे नसून आपल्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत असे मी ऐकले आहे, असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ree

मित्रांनो, माझ्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही या सरकारी पाहुण्यांचे स्वागतच करू, घाबरणे म्हणजे रोज रोज मरणे असते. आम्ही घाबरणार नाही. आम्हाला लढायचेच आहे.'गांधी गोऱ्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू' असं नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



 
 
 

Comments


bottom of page