top of page

PHOTO : नोबेल पुरस्कार विजेती मलाला अडकली लग्नबेडीत

शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युसुफझाईने ब्रिटनमध्ये लग्न केले आहे. तिने मंगळवारी असर मलिकसोबत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. यावेळी दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते.

ree

मलालाने स्वत: सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही आनंदवार्ता दिली आहे. फोटो शेअर करताना मलालाने लिहिले, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अनमोल दिवस आहे. असर आणि मी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी लग्नगाठ बांधली आहे.

ree

बर्मिंगहॅम येथील आमच्या घरी कुटुंबाच्या उपस्थितीत आम्ही एक छोटा निकाह सोहळा पार पाडला. आम्ही पुढच्या प्रवासात एकत्र चालण्यास उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.'

ree

मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देणाऱ्या मलालाला २०१२ मध्ये तालिबान्यांनी शाळेतून परतत असताना गोळ्या घातल्या होत्या. मुलींच्या शिकण्याच्या अधिकारासाठी सार्वजनिकपणे बोलल्याबद्दल तिच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यावेळी तिला बर्मिंगहॅममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर मलालाने ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.

ree

मलाला केवळ १७ वर्षांची होती जेव्हा तिला २०१४ मध्ये मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या भारताच्या कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वात तरुण विजेती होती. तिने ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि २०२० मध्ये पदवी प्राप्त केली.


 
 
 

Comments


bottom of page