top of page

'महाराष्ट्र केसरी' यंदा साताऱ्यात

"महाराष्ट्र केसरी " ही कुस्ती स्पर्धा मागील दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकली नाही. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत स्पर्धेचे ठिकाण व कालावधी याबाबतही निर्णय घेण्यात आला असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यंदा साताऱ्यात आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या ६४ व्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं ४ ते ९ एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात खेळवण्यात येईल. येत्या ४ ते ९ एप्रिलदरम्यान साताऱ्यात "महाराष्ट्र केसरी" कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेने दिली.

महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा माती व गादी या दोन विभागात रंगणार आहे. या दोन्ही विभागांत मिळून ९०० कुस्तीपटूंचा सहभाग असणार आहे. तसेच १०० ते १५० पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचाही यामध्ये समावेश असणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page