top of page

धक्कादायक : बस चालकाने प्रवाशांचा जीव घातला धोक्यात; पूर आलेल्या नदीमधून नेली एसटी बस

कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असताना कोकणामधील महाड तालुक्यामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचं पाणी नदीवरील पुलावरुन जात असतानाही बस घेऊन नदी ओलांडल्याचं दिसत आहे. चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घातला असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय

ree

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे काही भागांत संततधार सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस होत आहे. रत्नागिरीत सोमवारी दिवसभरात संध्याकाळी पाचपर्यंत १०२ मिलिमीटर पाऊस झाला. पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. महाडमधील रेवतळे येथील पूल पाण्याखाली गेला असून त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. नदीचे पाणी पुलावरुन वाहत असतानाही एस टी चालकाने बस नदीवरील पुलावरुन नेल्याचं दिसत आहे. या चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गाडी पूल दिसत नसतानाही नदीवरील पुलावरुन नेल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने एसटी चालकावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती.


५२ प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा एसटी चालक निलंबित...!

एसटी महामंडळाने प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे सांगत काल दिनांक १२ जुलै रोजी रेवतळे पुलावरून (तालुका: महाड ) पुराचे पाणी वाहत असताना देखील पुराच्या पाण्यात बस घालून, ५२ प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधित एसटी चालकाला निलंबित केले असल्याची माहिती दिली





 
 
 

Comments


bottom of page