top of page

महाबळेश्वर : सूर्यास्ताचा फोटो काढण्याच्या नादात १४ वर्षांचा मुलगा दरीत कोसळला...

सातारा : हल्लीची तरुण पिढी सोशल मीडियावर रोज काही ना काही पोस्ट करत सक्रिय राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याची हौस अनेकांना असते. मात्र फोटो काढण्यासाठी निवडलेल्या ठिकाणावरून कधी कधी ते अडचणीत येतात हे आपण पाहिले असेलच. अशीच एक घटना महाबळेश्वरमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. सूर्यास्ताचे अनोखे क्षण कॅमेरात टिपण्याच्या नादात १४ वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी झाला.

आदित्य जाधव (वय - १४) असं जखमी मुलाचे नाव असून तो आपल्या कुटुंबीयासह महाबळेश्वर इथं आला होता. महाबळेश्वर मधील लॉडविक पॉइंटवर सुर्यास्ताच्या वेळी सर्व कुटुंबीय फोटो काढण्यात मग्न होते. आदित्य सूर्यास्ताचा फोटो काढत असताना त्याचा तोल गेला आणि थेट दरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सने आदित्यचा शोध घेत बाहेर काढले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


 
 
 

Comments


bottom of page