top of page

अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; ‘अँटिलिया’ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या दूरध्वनीवर हा धमकीचा फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने फोनवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘अँटिलिया’ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात इसमाने सोमवारी सकाळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर फोन करून मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या धमकीच्या फोनबाबत माहिती दिली.

पोलिसांनी धमकी आलेल्या क्रमांकाची तपासणी केली. तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून पोलिसांचे एक पथक अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी रवाना झाले.


Comments


bottom of page