top of page

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झाली मोठी वाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेत नवीन दर जाहीर केले. व्यावसायिक वापरातील १९ किलोच्या एलपीजीच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर ५ किलोचा एलपीजी सिलिंडर २७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे तूर्त कोट्यवधी घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

ree

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव १९६२ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर आजपासून २०१२ रुपये झाला आहे. तर चेन्नईत २१८५.५ रुपये इतका झाला आहे. कोलकात्यात १९ किलो सिलींडरसाठी २०८९ रुपये दर असेल.

ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ या ४ महिन्याच्या कालावधीत व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत १७० रुपयांनी वाढ झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर घरघुती सिलिंडरच्या किमतीतही १०० ते २०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page