top of page

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. आज ( बुधवार ) सकाळी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.

या दरवाढीनंतर दिल्लीमधील १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. गॅस सिलेंडरसाठी आता मुंबईत १ हजार ५२ रुपये, चेन्नईत १ हजार ६८ तर कोलकातामध्ये १ हजार ७९ रुपये मोजावे लागतील. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीतही १८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या असल्या तरी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ८.५० रुपयांनी घट करण्यात आली आहे.


Comments


bottom of page