top of page

प्राण्यांनाही कोरोनाची लागण! देशातील पहिलीच घटना

देशभरात कोरोनाचा कहर सुरुच असतानाच आता प्राण्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला असल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्कमधील ८ सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील ही पहिलीच घटना असून सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ree

हैदराबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्कमध्ये सुमारे २ हजार प्राणी आहेत. हैदराबादच्या पार्कमधील सफारी क्षेत्रातील काही सिंहांमध्ये नाक वाहणे, भूक मंदावणे आणि खोकल्याची लक्षणे दिसून आली आहेत त्यानंतर सिहांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीने (सीसीएमबी) चार नर आणि चार मादी सिंहांचा कोरोना चाचणी अहवाल (आरटी-पीसीआर) पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती सीसीएमबीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. पार्कमधील सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सीसीएमबी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील आठ वाघ आणि सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कुठेही प्राण्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले नव्हते.


"हे खरे आहे की सिंहांनी कोविडची लक्षणे दर्शविली आहेत परंतु मला अद्याप सीसीएमबी कडून आरटी-पीसीआर अहवाल प्राप्त झाला नाही आणि म्हणून त्याबद्दल भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे नेहरू झुलॉजिकल पार्कचे संचालक डॉ. सिद्धानंद कुकरेती यांनी सांगितले. 

 
 
 

Comments


bottom of page