top of page

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीमध्ये बिबट्या शिरला ; परिसरात खळबळ

चाकण एमआयडीसीमध्ये असलेल्या मर्सिडीज बेंझ या कंपनीमध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्या शिरला असल्याचे कंपनीच्या सुरक्षारक्षकाला दिसले. त्यानंतर पोलिसांना याची देण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून याविषयी वनविभागाला याविषयी माहिती दिली आहे.यानंतर वन्यधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मर्सिडीज कंपनीतील बॉडी शॉप येथे हा बिबट्या शिरला आहे. मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही. तेथील कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कंपनीत पिंजराही बसवण्यात आला आहे.



 
 
 

Comments


bottom of page