top of page

व्हिडीओ : मुंबईत बिबट्याने केला महिलेवर हल्ला

मुंबई : आरे कॉलनीत एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून यात महिलेने काठीने बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला. निर्मला देवी सिंग असं या महिलेचं नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

व्हिडीओत आरे डेअरी परिसरात हा बिबट्या आल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच तिथे एक वयस्कर महिला काठीचा आधार घेत चालत बाहेर येऊन पायरीवर बसताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या मागे दबा धरुन बिबट्या बसला आहे याची त्यांन कल्पनाच नव्हती. काही वेळाने बिबट्या महिलेवर काही कळण्याआधीच हल्ला करतो. यावेळी महिला हातातल्या काठीने प्रतिकार करण्यास सुरुवात करते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खाली जमिनीवर पडलेल्या महिलेवर बिबट्या पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र महिलेचा प्रतिकार पाहता काही वेळाने तो तिथून पळ काढतो.

बिबट्याने हल्ला करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी चार वर्षाच्या एका मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. मुलगा आपल्या घराबाहेर खेळत असताना बिबट्याने हल्ला करत त्याला खेचत नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने स्थानिकांनी धाव घेतल्याने मुलाचा जीव वाचला.


 
 
 

Comments


bottom of page