top of page

किम शर्मा-लिएंडर पेस लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

लिएंडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. किम शर्मा आणि लिएंडर पेस हे अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे किम शर्मा आणि लिएंडर पेस दोघेही लवकरच लग्न करून त्यांच्या नात्याची नवी सुरुवात करणार आहेत.

किम आणि लिएंडर या दोघांनी थाटामाटात लग्न न करता अत्यंत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अद्याप यावर लिएंडर किंवा किम यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण या दोघांच्या लग्नाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री किमचं हे दुसरं आणि लिएंडरचं तिसरं लग्न असणार आहे. किम शर्माने २०१० मध्ये बिझनेसमन अली पुंजानीसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 6 वर्षानंतर म्हणजेच २०१६ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. लिएंडर पेसने २०१४ मध्ये त्यांनी रियापासून घटस्फोट घेतला.त्यांनतर आता किम आणि लिएंडर नव्याने आपला संसार थाटण्यासाठी तयार आहेत.



Comments


bottom of page