top of page

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच मित्राची भेट घेण्यासाठी लटके हे सहकुटुंब दुबईला गेले होते तेव्हाच हा प्रकार घडला.

ree

बुधवारी रात्री अचानक लटके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. लटके यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांच्या समर्थकांना आणि शिवसैनिकांना मोठा धक्का बसलाय.


 
 
 

Comments


bottom of page