top of page

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; म्हणाले, संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करत एक गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असून याची चौकशी करण्याची मागणी ही सोमय्या यांनी केली आहे.

ree

संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवलं. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचं कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवलं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA ला चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.

याचबरोबर, “आज दुपारी 4 वाजता मी शिवाजी नगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत पार्टनर सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करणार, खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला.कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page