top of page

" २६ मार्च - चला दापोली...अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया "; सोमय्यांच्या ट्विटने खळबळ

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट संदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी आज सकाळी "२६ मार्च - चला दापोली.... अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया". असं ट्विट केलं आहे. या ट्विटने खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. त्यानंतर आता तारीख जाहीर करुन रिसॉर्ट तोडण्याबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पुन्हा होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.


 
 
 

Comments


bottom of page