top of page

‘झेड प्लस’ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण…

‘आयएनएस ‘विक्रांत’ला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केल्याचे, परंतु ते राज्यपालांच्या कार्यालयात जमा केले नसल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाने सोमय्या किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी सुरु होण्याआधीच किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील हे बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय.

ree

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करत गृहमंत्रालयावर निशाणा साधलाय. “किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे. पण ‘झेड प्लस’ सीआयएसएफ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती निश्चितपणे असेल,” असं या प्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, “जर किरीट सोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यकता असेल तेव्हा माहिती देणे हे केंद्रीय गृहमंत्रालयाचं कर्तव्य आहे,” असंही क्रास्टो यांनी म्हटलं आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने सोमय्या यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. एवढी मोठी सुरक्षा घेऊन फिरणारे सोमय्या बेपत्ता कसे होऊ शकतात असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केलाय. तसेच सोमय्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले जवान नेमके कुठे आहेत याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला असणारच असं म्हणत राष्ट्रवादीने सवाल उपस्थित केलाय.




 
 
 

Comments


bottom of page