top of page

कृष्णा नदीत बुडून शिक्षकासह पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून मृतांमध्ये पाच विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ree

मिळलेल्या माहितीनुसार हे सर्व विद्यार्थी अच्छामपेटमधील मादीपाडू गावाच्या परिसरात असलेल्या श्रृंगाचलम वेदपाठशाळेत शिकत होते. ते आंघोळीसाठी गावापासून जवळच असलेल्या कृष्णा नदीवर गेले होते. तेव्हा त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधमोहीम राबवली, अथक प्रयत्ननंतर त्यांच्या हाती सहा जणांचे मृतदेह लागले आहेत. मृतांमध्ये तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेशचे आणि दोन विद्यार्थी हे मध्य प्रदेशचे होते. त्यांना शिकवणारे शिक्षक सुब्रम्ण्यम हे नारसरावपेटा गावातील रहिवासी होते. तर हर्षित शुक्ला (15), शुभम त्रिवेदी (17), अंशुमान शुक्ला (14), शिव शर्मा (14), नितेश कुमार दीक्षित (15) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page