top of page

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सहलीला गेलेल्या भाजप नगरसेविकेचा मृत्यू

नाशिक: जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. १५ फेब्रुवारी रोजी सुरगाणा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेंबांधणी सुरू केली आहे. नगरसेवक फुटू नये म्हणून सर्वच पक्ष काळजी घेत आहेत. भाजपने त्यांच्या सर्व नगरसेवकांना वापी (गुजरात) येथे सहलीला पाठवले होते. या दरम्यान भाजपच्या नगरसेविका काशीबाई पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे..

ree

सुरगाणा नगरपंचायतीच्या १७ जागासाठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भाजपला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या असून शिवसेना ६, माकप २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. नगराध्यक्ष पदाकरिता बहुमतासाठी ९ नगरसेवकांची गरज आहे. भाजपकडे ८ नगरसेवक असून त्यांना एक नगरसेवकाची गरज आहे.

मंगळवारी १५ फेब्रुवारीला नगराध्यक्षाची निवडणूक होणार असल्याने भाजपने त्यांचे सर्व नगरसेवक सहलीला पाठवले आहे. हे नगरसेवक वापीच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले असताना रात्री नगरसेविका काशीबाई पवार यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.


 
 
 

Comments


bottom of page