top of page

सावधान! कोल्हापूर जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण

कोल्हापूर : काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आज जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूंचे एकूण सहा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यापैकी कोल्हापूर शहरात ३, हातकणंगलेमध्ये २ आणि निगवे दुमाला येथे १ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

शहरात सापडलेला एक रूग्ण विचारे माळ तर दोन रूग्ण साने गुरूजी वसाहत परिसरातील आहेत. विशेष म्हणजे त्यांचा अहवाल रविवारी आला असला तरी हे सर्व रूग्ण यापूर्वीच बरे झालेले आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्या भागात डेल्टा प्लसचे रूग्ण सापडले आहेत, त्या भागात तातडीने नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. महापालिका, जिल्हा परिषदेसह आरोग्य विभागाची यंत्रणा गतीमान झाली आहे.


 
 
 

Comments


bottom of page