top of page

दर्शन रांगेत भाविकाचा मृत्यू

अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगेत एका भाविकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामनाथ जाधव ( वय ६२, जि.अहमदनगर ) असं असं मृत भाविकांचं नाव आहे. रामनाथ जाधव आपल्या मित्रांसह दक्षिण भारताची सहल करून कोल्हापुरात आले होते. बुधवार, दि. २९ मार्च रोजी सकाळी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी ते मंदिरातील दर्शन रांगेत उभे होते. यावेळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच कोसळले.

त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



 
 
 

Comments


bottom of page