top of page

कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून होणार सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यू दर वाढल्याने व्यवहारावर निर्बंध घातले होते. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्हा कोरोना नियमावलीच्या तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर दुकाने सुरू होऊ शकतील. तसे प्रयत्न सुरू आहेत, वरिष्ठ अधिकारी बैठक घेवून याबाबतची भूमिका जाहीर करतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर आज अखेर सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना या शनिवार व रविवार बंद राहतील, असा आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढला आहे.


 
 
 

Comments


bottom of page