top of page

कोकण रेल्वे मार्गांवरील २० रेल्वे गाड्या रद्द

७२ तासांचा मेगा ब्लाॅक जाहीर

ree

रत्नागिरी : मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे आणि दिवा स्थानकदरम्यान ७२ तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळं कोकण रेल्वे मार्गांवरील २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे ते दिवा या स्थानका दरम्यान ५, ६ आणि ७ फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घोषित केल्याचे पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान या मेगा ब्लॉकमुळं कोकण रेल्वेने नियाेजीत वेळापत्रक माेठा बदल केला आहे.

या कालावधीत जवळपास २० गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. प्रवाशांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहण्यासाठी ...



 
 
 

Comments


bottom of page