top of page

कोकणवासियांसाठी मोठी बातमी; रेल्वे प्रशासनाने सुरू केली 'ही' विशेष गाडी

कोकणात सुट्टीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून (२१ नोव्हेंबर) पनवेल ते मडगाव ही विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांना होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने घेतेलल्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ree

आजपासून ३ जानेवारीपर्यंत दर रविवारी पनवेल ते मडगाव ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. ०१५९६/०१५९५ ही रेल्वे गाडी मडगाव येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. तर पनवेल येथून दर सोमवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून त्याचदिवशी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मडगावला पोहोचेल.

या विशेष रेल्वेला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page