कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी
- Mahannewsonline

- Mar 25, 2022
- 1 min read
मुंबईः प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता लोकमान्य टिळक टर्मिनस व सावंतवाडी रोडदरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आज, शुक्रवार दि. २५ मार्च ते २ एप्रिलदरम्यान ही रेल्वे धावणार आहे.
गाडी क्रमांक ०१०२३ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास (०१०२४) सकाळी ११.३५ वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता ती लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. दोन-तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह सहा सामान्य द्वितीय श्रेणी अशी या गाडीतील डब्यांची रचना आहे. संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.inवर आरक्षण खुले झाले आहे.





















Comments