top of page

‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री; केला "या" पक्षामध्ये प्रवेश

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘दी ग्रेट खली’ म्हणून ओळख असणारा भारतीय व्यावसायिक रेसलर दलिपसिंग राणा याने राजकारणात एंट्री. केली आहे. आत्तापर्यंत अनेक रेसलर्सला फाईटच्या आखाड्यात चितपट करणाऱ्या खलीनं आज भाजपामध्ये प्रवेश केला.


खली हे मुळचे हिमाचल प्रदेशचे असून ते जालंधर येथे रेसलिंग अकॅडमी चालवतात.


“ भाजपामध्ये प्रवेश केल्याचा मला आनंद होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेल्या कामामुळे ते योग्य पंतप्रधान ठरतात. त्यामुळे मी विचार केला की आपण देशाच्या विकासातील त्यांच्या कामाचा हिस्सा का बनू नये? भाजपाच्या राष्ट्रीय धोरणांमुळे प्रभावित झाल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया खलीनं दिली आहे.



 
 
 

Comments


bottom of page