top of page

खडकवासला धरण @ १०० टक्के

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे, खडकसावला धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला असून मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणं भरत असंल्याने आता पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.

ree

खडकवासला धरण १०० टक्के भरलं असल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. मुळशी धरणात सध्या ९४% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी २०००-२३०० क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊसाची परिस्थिती पाहून सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.


 
 
 

Comments


bottom of page