top of page

मोठी कारवाई! किरण गोसावी अखेर पोलिसांच्या ताब्यात

आर्यन खान प्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता

आर्यन खान प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या फरार किरण गोसावीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. किरण गोसावीला ताब्यात घेतल्यामुळे आर्यन खान प्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ree

एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेताना पंच म्हणून किरण गोसावी त्यावेळी उपस्थित होता. त्याने आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीची बरीच चर्चा झाली. त्यानंतर किरण गोसावी हा पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचं समोर आलं होतं. गोसावीच्या अंगरक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता होता. गोसावीवर त्याच्या अंगरक्षक प्रभाकर साईलने शाहरुखकडून कोट्यवधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला. तसंच गोसावीने सोमवारी वृत्तवाहिन्यांशी फोनद्वारे संपर्क साधून आपण महाराष्ट्र पोलिसांऐवजी उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे म्हटलं होतं. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊतही पोहोचलं होतं. अनेक दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या किरण गोसावीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे राज्यात सध्या खळबळ उडाली असून समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांकडूनही स्पष्टीकरण दिलं जात आहे. तर एनसीबीचा साक्षीदार प्रभारक साईलने जबाब पलटला असून समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा अंगरक्षक होता. किरण गोसावीला ताब्यात घेतल्यामुळे आर्यन खान प्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.


 
 
 

Comments


bottom of page