top of page

अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत राहणारी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. यावेळी तिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ree

केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टवरून केतकीवर आता टीका होऊ लागली आहे. या कवितेमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. याप्रकारानंतर तिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्यासह कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळे ही मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री असून बऱ्याच काळापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण अधूनमधून ती आपल्या सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधानं करताना दिसून आली आहे. त्यामुळं तिला अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलही व्हावं लागलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page