top of page

पतीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच रॉकेट हल्ला; भारतीय महिलेचा मृत्यू

पॅलेस्टाइनने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये केरळमधील एका महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू झाला आहे. ३१ वर्षीय सौम्या व्हिडीओ कॉलवर पती संतोषसोबत बोलत असतानाच शहरावर रॉकेट हल्ला झाला. हे रॉकेट सौम्या यांच्या निवासस्थानावर कोसळलं आणि त्यांचं निधन झालं.असल्याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

ree

इडुक्की जिल्ह्यातील किरीथोडू येथील रहिवासी असणाऱ्या सौम्या इस्त्रायलमध्ये गेल्या सात वर्षांपासून काम करत होते. सौम्या तिथे घरकाम करायच्या अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तिला एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. “माझ्या भावाला व्हिडीओ कॉल सुरु असतानाच मोठा आवाज ऐकू आला. यानंतर अचानक व्हिडीओ कॉल कट झाला. आम्ही तात्काळ तेथील इतर आमच्या ओळखींच्या लोकांना फोन केले तेव्हा झालेल्या घटनेची माहिती मिळाली,” असं संतोष यांच्या भावाने सांगितलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page