top of page

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयात आज हजर करण्यात आलं. ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केतकी चितळे हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page