top of page

केतकी चितळे कोर्टात म्हणाली, "मी माझी पोस्ट डिलिट करणार नाही... "

केतकी चितळेला १८ मेपर्यत पोलीस कोठडी

ree

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकी चितळे चर्चेत आली आहे. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. तिला कोर्टात हजर केले असता कोर्टानं तिला १८ मेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी केतकीनं कोर्टात आपली बाजु मांडताना काही केल्या आपण ती पोस्ट डिलिट करणार नाही. असं सांगितले आहे. यावेळी कोर्टाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

केतकीनं स्वत:चं कोर्टात बाजु मांडली. यावेळी ती म्हणाली, मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे. तिच्या या वक्तव्याचा सोशल मीडियातून अनेक नेटकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मी ही स्वखुशीनं ही पोस्ट केली असल्याचेही केतकीनं कोर्टात सांगितले. कोर्टानं केतकीला १८ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.


 
 
 

Comments


bottom of page