top of page

PHOTO: कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनात; लग्नाचे फोटो आले समोर

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे आज (गुरुवारी) दुपारी दोघांनी सात फेरे घेतले. कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाची प्रायव्हसी जपण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. आणि काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

ree

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे पार पडला.

ree

या लग्नाला विकी आणि कतरिनाच्या कुटुंबासह काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. विक्कीने लग्नात ऑफ व्हाइट शेरवानी घातली होती. तर कतरिना कैफ लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.

ree

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्न सोहळा ७ डिसेंबरपासून सुरू होते. ७ डिसेंबर रोजी संगीतासह मेहंदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता.

ree

ree

फोटो : कतरिना कैफ,विकी कौशल (इन्स्टाग्राम)


 
 
 

Comments


bottom of page