top of page

करारा जवाब मिलेगा... ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित

गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेतल्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. मशिदींवरच्या भोंग्यांबद्दलच्या राज ठाकरे यांच्या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसंच पुण्यात वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेने प्रदर्शित केला आहे.

राज ठाकरेंच्या १२ एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे ‘करारा जवाब’ देणार असे म्हटले आहे.



 
 
 

Comments


bottom of page