top of page

VIDEO : पावसाचे थैमान; रेल्वे पूल कोसळला

हिमाचल प्रदेशसोबतच उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून हिमाचलमधील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कांगडा जिल्ह्यात पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चक्की नदीवर उभारण्यात आलेला ८०० मीटर लांब रेल्वे पूल मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९२८ मध्ये ब्रिटिशांनी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू केला. या पुलावरून ७ रेल्वे गाड्या धावत होत्या. चक्की नदीला अचानक आलेल्या पुरामुळे हा पूल कोसळला. सुदैवाने हा पूल कोसळला तेव्हा यावर कोणीही नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पुलाचे बांधकाम होईपर्यंत पठाणकोठ ते जोगिंदरनगर दरम्यान नॅरोगेज रेल्वे सेवा बंद राहणार आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.


 
 
 

Comments


bottom of page