top of page

Video : रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला...

मुंबई : रेल्वे रुळ ओलांडू नका, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करा, अशा उद्घोषणा रेल्वे प्रवाशांसाठी सातत्यानं दिल्या जातात. तरीही प्रवाशी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रूळ ओलांडताना अनेकदा दुर्घटना घडतात. असाच प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर रविवारी घडला. पायलटने वेळीच प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला.

ree

रेल्वे रूळ ओलांडताना एक वयोवद्ध व्यक्ती मुंबई-वाराणसी एक्स्प्रेससमोर आली. मात्र, लोको पायलटने वेळीच ब्रेक मारल्यानं मोठा अनर्थ टळला. त्यानंतर रेल्वे इंजिन खाली अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर शेअर करत रुळ न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे. प्रसंगावधान दाखल्याबद्दल लोको पायलटसह इतर अधिकाऱ्यांना २ हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.


 
 
 

Comments


bottom of page